शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीजवळ भीषण अपघात; पुण्यातून सोलापुरला निघालेले तीन मित्र ठार

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 4, 2023 12:55 IST

भवानी पेठेवर शोककळा ; पुण्यावरून ट्रिपल सीट येणे भोवले

काशिनाथ वाघमारे सोलापूर : शहरातील तिघा मित्रांना एकाच दुचाकीवरुन येणे भोवले आहेत. टेंभुर्णीजवळ गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन मित्र जागीच ठार झाले तर तिसरा मित्र सोलापुरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातानंतर भवानी पेठेवर शोककळा पसरली आणि त्या तिघांच्या मित्रांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.   

तेजस सुरेश इंडी (वय २०, रा. मिलन अपार्टमेंट, भवानी पेठ), लिंगराज शिवानंद हाळके (वय २४, रा. भवानी पेठ) हे दोघे जागीच ठार झाले तर तिसरा मित्र गणेश शरणप्पा शेरी हा सोलापुरात उपचार घेत असताना मरण पावला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी घेतली.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तेजस इंडी, लिंगराज हाळके आणि गणेश शेरी हे तिघे एकस मोटार सायकल (एम. एच. १३/ डी. झेड. ९८२६) वरुन सोलापूरहून पुण्याला निघाले होते. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान ते सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अरण गावच्या हद्दीत वरवडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अनोळची वाहनाची धडक बसली. या अपघातात तेजस इंडी आणि लिंगराज हाळके यांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा मित्र गणेश शेरी हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर प्रथमत: गस्तीवरील महामार्ग पोलिसांनी अपघातातील वाहन बाजूला करुन तिघांना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे दाेघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि तिसरा जखमी गणेश शेरी यास शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघात प्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जोग हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूरPuneपुणे