शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

एकुलत्या एक तरण्याबांड लेकरांच्या अकाली मृत्यूनंतर तीन कुटुंबं एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:17 IST

अपघातास वर्ष पूर्ण :  आसबे, माळगे अन् गुमडेल करणार जागृती; ‘आमची मुलं गेली.. तुमची जाऊ देऊ नका’

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : १९ नोव्हेंबर २०१७ ची ती पहाट... तुळजापूर रस्त्यावरील अपघातात एकलुते एक अशी तीन मुलं काळाच्या पडद्याआड गेली... तशी तिन्ही मुलांचा जबरदस्त दोस्ताना. या तीन तरण्याबांड लेकरांचं अकाली जाण्यानं समदु:खी माळगे, गुमडेल अन् आसबे ही कुटुंबे एकत्र आली आहेत. स्वत:च्या दु:खावर फुंकर घालीत हे तीन मित्र जणू सख्ख्या भावासारखे आज वावरताना दिसतात. ‘आमची मुलं गेली... तुमची जाऊ देऊ नका’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून ‘त्या’ लेकरांना खºया अर्थाने श्रद्धांजली असेल, अशा भावना मडोळप्पा नागेश माळगे, जयंत विजयकुमार गुमडेल आणि विजय चांगदेव आसबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

संगमेश (विनू) मडोळप्पा माळगे, दीपक जयंत गुमडेल आणि अक्षय विजय आसबे ही तीन मुले नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिक या तृतीय वर्षात शिकत होती. अभ्यासातच नव्हे तर कॉलेजच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही तिघे सरसच होती. काळाला ते पाहावले नाही आणि १९ नोव्हेंबर २०१७ ची पहाट त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. जशी तिघांची मैत्री तशी त्यांच्या एकमेकांच्या पित्याची ओळख ना पाळख. मात्र घटनेच्या महिनाभरानंतर तिघे समदु:खी पिता एकत्र आले. केवळ हे तिघेच नव्हे तर तिघांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांचे दु:ख दूर सारण्यासाठी अगदी समरस होऊन गेले आहेत. अगदी हाताला आलेली... उद्या परवा आपलं आधारवड बनणारी आपली लेकरं गेली तर आता आपल्या मुलीलाच मुलगा मानलाय या शब्दात माळगे, गुमडेल, आसबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

वर्षभर ना सण, ना उत्सव

  • - लेकरांच्या जाण्यानं तिन्ही कुटुंबातील सदस्य आजही दु:खाच्या छायेखाली आहेत. सण, उत्सवासारख्या आनंदालाही त्यांनी दूर केलं. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली ही लेकरं देवाघरी गेली असली तरी केवळ त्यांच्या आठवणींवरच एकेक दिवस कंठीत असतो, अशा भावना व्यक्त करताना माळगे, गुमडेल, आसबे यांच्या नेत्रांमधून अश्रूही टपकत होते. 

मुलांचे सवंगडीच हीच आता आमची मुलं...

  • - एखादा मित्र गेला तर त्याचा दुसरा मित्र काही दिवसांनी दूर जातो. इथे मात्र संगमेश माळगे, दीपक गुमडेल आणि अक्षय आसबे यांच्याशी साथसंगत करणाºया मित्रांचं आजही आमच्या घरी येणं-जाणं आहे. रघू मेतन, शुभम वारद, फताटे, हेमंत थळंगे, शिवप्रसाद मठ, शरद आनंदकर, गणेश बत्तूल, अक्षय गिराम, धरणे या सवंगड्यांचं आमच्या घरी येणं म्हणजे कुठेतरी आमच्या लेकरांचं दु:ख विसरणं असेच म्हणता येईल. हीच मुलं आता आमची मुलं बनून राहिली आहेत. 

तर नोकरीचा राजीनामा दिला असता-माळगे

  • - मुलगा तृतीय वर्षात शिकत होता. त्याची हुशारी, कल्पकता पाहता अंतिम वर्ष झाल्यावर हमखास चांगल्या पगाराची नोकरीही मिळणार होती, असा आत्मविश्वासही होता. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर मी शिवशाहीतील नोकरीचा राजीनामा देणार होतो. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. आता मुलीसाठी मी नोकरी करीत राहणार असल्याचे मडोळप्पा माळगे बोलत होते. 
टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी