शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

करकंबमध्ये तीन ठिकाणी दरोडा; एकाच कुटुंबातील पाच जणांना चोरट्यांनी केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:31 IST

करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू, अशोक गजेंद्र ...

ठळक मुद्दे घटनास्थळी करकंब पोलीसांसह, मोबाईल फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक आणि आय बाइक अशी विविध पथके दाखलतिघांनाही करकंब येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवले

करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू, अशोक गजेंद्र शेटे तसेच अनिल अंकुश धायगुडे या वेगवेगळ्या तीन कुटुंबांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात अनिल घायगुडे यांच्यासह पत्नी अश्विनी धायगुडे व आई विमल धायगुडे यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.

 याबाबातची सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी - पंढरपूर रोडवरील व्यवहारे पाटीच्या दरम्यान वरील तिन्ही कुटुंबे एकमेकांपासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्यास आहेत. यातील रहिमान कोरबू यांच्या घरी रात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण एका खोलीत झोपलेले असताना दुसºया खोलीचे कडी कोयंडा उचकटुन एक तोळा सोन्याचे नेकलेस, गलसर आणि दीड तोळे सोन्याचे घंटन असे एकूण साडेतीन तोळे सोन्यासह रोख १५ हजार रुपये असा एकूण ६७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, तसेच अशोक गजेंद्र शेटे यांच्या घरातील १ तोळे सोन्यासह ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा अनिल अंकुश धायगुडे यांच्या घराकडे वळवून यांच्यासह घरातील त्यांच्या आई विमल धायगुडे, पत्नी अश्विनी धायगुडे यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले़ वरील तिघांनाही करकंब येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. घटनास्थळी करकंब पोलीसांसह, मोबाईल फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक आणि आय बाइक अशी विविध पथके दाखल झाली आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस