वायरमन मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:36+5:302021-05-15T04:20:36+5:30
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कर्जत-करमाळा रस्त्यावर रावगाव हद्दीत रोहित्राचे काम करण्यासाठी गेल्यानंतर अचानक वीजपुरवठा सुरू केल्याने नितीन पाटील ...

वायरमन मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कर्जत-करमाळा रस्त्यावर रावगाव हद्दीत रोहित्राचे काम करण्यासाठी गेल्यानंतर अचानक वीजपुरवठा सुरू केल्याने नितीन पाटील हा मयत झाला होता. यावेळी गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारांवर रोष व्यक्त केला. भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली. तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त जमावाने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. अखेर रात्री उशिरा तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच खातेनिहाय या घटनेची चौकशी होणार असल्याने गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.