महिलेवरील अत्याचारप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:27 IST2021-02-25T04:27:31+5:302021-02-25T04:27:31+5:30

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात एका महिलेला दुधाचा हिशोब करायचा आहे सांगून फोन करून बोलावून घेतले. दोघा साथीदारांच्या मदतीने ...

Three charged in atrocities against women | महिलेवरील अत्याचारप्रकरणी तिघांवर गुन्हा

महिलेवरील अत्याचारप्रकरणी तिघांवर गुन्हा

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात एका महिलेला दुधाचा हिशोब करायचा आहे सांगून फोन करून बोलावून घेतले. दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

२० फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हनमा पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला ही दोन-तीन आठवडे हनमाकडून दररोज अर्धा लिटर दूध घेत होती. दुधाचे पैसे थकले होते. त्याने दूध देणे बंद केले होते. मात्र आरोपी पाटील याने पीडितेच्या मोबाईलवर फोन करून आत्ताच्या आत्ता दुधाचा हिशेब करायचा असल्याचे सांगून बोलवून घेतले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्याने अत्याचार केला. या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे करीत आहेत.

Web Title: Three charged in atrocities against women