तिघा भावांची दोन भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:59+5:302021-01-08T05:09:59+5:30

प्रवीण भोजलिंग पालसांडे याने संदीप दत्तात्रय खुळपे, अजित दत्तात्रय खुळपे, संतोष दत्तात्रय खुळपे या तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ...

Three brothers beat two brothers | तिघा भावांची दोन भावांना मारहाण

तिघा भावांची दोन भावांना मारहाण

प्रवीण भोजलिंग पालसांडे याने संदीप दत्तात्रय खुळपे, अजित दत्तात्रय खुळपे, संतोष दत्तात्रय खुळपे या तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

बलवडी येथील प्रवीण पालसांडे व दत्तात्रय खुळपे यांच्यात शेतजमिनीवरून भांडण झाले होते. २ जानेवारी रोजी सायं. ६ च्या सुमारास प्रवीण पालसांडे व त्याचा भाऊ महेश पालसांडे हे दोघे दुचाकीवरून शेतातील ज्वारीच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. तर दत्तात्रय खुळपे हे त्यांच्या शेतातील बागेत डाळिंब काढत होते. त्यावेळी प्रवीण व महेश पालसांडे हे तेथून जात असताना संदीप खुळपे याने तुम्ही इकडे शेतात कशासाठी आला, असे म्हणून त्यांच्या दुचाकीस लाथ मारून खाली पाडले. हे आमचे शेत आहे तुम्ही इकडे यायचे नाही, असे म्हणून संदीप खुळपे, अजित खुळपे, संतोष खुळपे हे प्रवीण पालसांडे यास काठीने मारहाण करू लागले.

यावेळी भाऊ महेश पालसांडे भांडण सोडवण्यासाठी आला असता तू कशाला भांडण सोडवतो, असे म्हणून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण केली.

Web Title: Three brothers beat two brothers