वाळू वाहतूक करणाऱ्या तीन होड्या फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:14+5:302021-06-09T04:28:14+5:30

भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना मिळाली. त्यांनी मंडळ अधिकारी समीर मुजावर, ...

Three boats transporting sand broke | वाळू वाहतूक करणाऱ्या तीन होड्या फोडल्या

वाळू वाहतूक करणाऱ्या तीन होड्या फोडल्या

भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना मिळाली. त्यांनी मंडळ अधिकारी समीर मुजावर, तलाठी प्रशांत शिंदे, तलाठी राजेंद्र वाघमारे, पोलीस कर्मचारी ताजुद्दीन मुजावर, पी. आर. हजारे, होमगार्ड शंकर कांबळे हे भीमा नदीवरील अहिल्यादेवी पुलानजीक गेले. यावेळी त्यांना तीन होड्यांमधून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. महसूल व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहतच वाळू उपसा व वाळू वाहतूक करणारे पळून गेले.

यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये किमतीच्या तीन होड्या जेसीबीच्या साहाय्याने फोडल्या व पाच हजार रुपये किमतीची वाळू नदीपात्रात पुन्हा टाकली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-----

जेसीबीच्या साहाय्याने होड्या फोडताना मंडळ अधिकारी समीर मुजावर, तलाठी प्रशांत शिंदे, राजेंद्र वाघमारे, ताजुद्दीन मुजावर, पी. आर. हजारे, शंकर कांबळे आदी.

Web Title: Three boats transporting sand broke