पाचेगाव येथे तिघांची एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:49+5:302021-03-24T04:20:49+5:30

याबाबत जखमी तुकाराम बाबुराव खांडेकर (रा. चोपडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संतोष साधू हिप्परकर, शिवाजी ...

Three beaten to death at Pachegaon | पाचेगाव येथे तिघांची एकास मारहाण

पाचेगाव येथे तिघांची एकास मारहाण

याबाबत जखमी तुकाराम बाबुराव खांडेकर (रा. चोपडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संतोष साधू हिप्परकर, शिवाजी भीमराव हिप्परकर (रा. जुजारपूर) व भीमराव बाबुराव खांडेकर (रा. बुद्धेहाळ, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चोपडी येथील तुकाराम खांडेकर हे रविवारी स. ८ वाजता पाचेगाव खु. येथे सायकलवरून गेले होते. काम आटोपून ते परत घराकडे निघाले होते. यावेळी संतोष हिप्परकर, शिवाजी हिप्परकर व भीमराव खांडेकर यांनी तुकाराम यास तू परत बाळासाहेब बाबुराव खांडेकर यांच्या शेतात पाय ठेवलास तर बघ, परत तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून तिघांनी त्यास मारहाण केली. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास एक दुचाकी तेथून जात असलेले मेव्हणे शशिकांत करांडे व पत्नीने तुम्ही येथे काय करता, असे विचारल्यानंतर त्यांना घडला प्रकार सांगितला.

Web Title: Three beaten to death at Pachegaon