तिघांनी पैशांच्या कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:27 IST2021-04-30T04:27:19+5:302021-04-30T04:27:19+5:30

जखमी अख्तर मुलाणी हा एमएच ४५/ एजे ८९८७ या दुचाकीवरून घरी येत असताना, पाटील-नायकवडी वस्तीच्या पाठीमागील रोडवर समोरून ...

The three beat each other for money | तिघांनी पैशांच्या कारणावरून एकास मारहाण

तिघांनी पैशांच्या कारणावरून एकास मारहाण

जखमी अख्तर मुलाणी हा एमएच ४५/ एजे ८९८७ या दुचाकीवरून घरी येत असताना, पाटील-नायकवडी वस्तीच्या पाठीमागील रोडवर समोरून अकील दादा मुलाणी याने येऊन थांबविले व माझे २० हजार रुपये कधी देणार, असे म्हणून शिवीगाळी, दमदाटी करू लागला. त्यास अख्तरने तुझे २० आणले आहेत, घे, म्हणाला. मात्र, त्याने मला आणखी १० हजार रुपये पाहिजेत, म्हणून गच्ची पकडून मारहाण केली. त्याने एवढ्यावरच न थांबता, फोन करून इमरान दस्तगीर शेख यास गडी घावला आहे, काठी व हत्यार घेऊन ये, असे त्यास सांगितले.

थोड्याच वेळात इमरान दुचाकीवरून काठी व सत्तूर घेऊन तेथे आला. त्याचे पाठोपाठ शकील मुलाणी चारचाकीतून येऊन मला धरून अकीलने मला अजून १० हजार रुपये दे, नाहीतर तुला जीवे मारतो, असे म्हणून हातातील सत्तूरने डोक्यात वार केला. तर इम्रानने हातातील काठीने माझ्या डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण करू लागला. आमची भांडणे पाहून सत्यवान चव्हाण, चद मुलाणी, बिलाल मुलाणी, जैनुद्दिन मुलाणी यांनी सोडवा-सोडवी केली. त्यानंतर, सर्व जण दुचाकी, चारचाकी वाहनातून निघून गेले. याबाबत अख्तर कबीर मुलाणी यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अकील दादा मुलाणी, शकील दादा मुलाणी व इमरान दस्तगीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The three beat each other for money