जागेच्या कारणावरून मूळ मालकास जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST2020-12-26T04:18:16+5:302020-12-26T04:18:16+5:30

पाचेगाव बु. (ता. सांगोला) येथील विलास रावसाहेब दौंड, भाऊ रघुनाथ दौंड, मुलगा प्रथमेश आणि प्रतीक हे २४ रोजी ...

Threatened to kill the original owner for space reasons | जागेच्या कारणावरून मूळ मालकास जिवे मारण्याची धमकी

जागेच्या कारणावरून मूळ मालकास जिवे मारण्याची धमकी

पाचेगाव बु. (ता. सांगोला) येथील विलास रावसाहेब दौंड, भाऊ रघुनाथ दौंड, मुलगा प्रथमेश आणि प्रतीक हे २४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या जागेत नवीन घराच्या बांधकामाचा पाया खोदत होते. त्यादरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नंदा वसंत चव्हाण, त्यांचा मुलगा बबन व मुलगी मनीषा हे तिघे तेथे आले. त्यांनी तुम्ही या जागेवर बांधकाम करायचे नाही. ही जागा आमच्या मालकीची आहे. सदर जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात केस दाखल केली आहे. त्यावेळी विलास दौंड यांनी सदरची जागा माझ्या मालकीची असून, त्याचा उतारा माझ्या नावावर आहे, असे सांगून पाया खोदण्यासाठी टिकाव घेण्यास निघाले. यावेळी त्या तिघांनी त्यांना अडविले. यावेळी नंदा चव्हाण हिने तुला येथून जाऊन देणार नाही, असे म्हणत असता भाऊ रघुनाथ दौंड याने तिला सदरची जागा माझ्या मालकीची आहे, असे समजावून सांगितले. यावेळी नंदा चव्हाण यांचा मुलगा बबन याने तुला आत्ता सोडून देतो, पण पुन्हा या जागेत पाय ठेवलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी दमदाटी करून तेथून निघून गेले. याबाबत, विलास रावसाहेब दौंड यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Threatened to kill the original owner for space reasons