प्रदूषित पाण्यामुळे श्री सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत्युमुखी; परिसरात दुर्गंधी
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 27, 2024 18:18 IST2024-05-27T18:18:43+5:302024-05-27T18:18:57+5:30
श्री सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडले. मागील काही दिवस पडला. या पावसाचे प्रदूषित पाणी तलावात गेले.

प्रदूषित पाण्यामुळे श्री सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत्युमुखी; परिसरात दुर्गंधी
सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडले. मागील काही दिवस पडला. या
पावसाचे प्रदूषित पाणी तलावात गेले. त्यामुळेच हे मासे दगावले असल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमी करत आहेत. मृत झालेले बहुतांश मासे हे पिल्लं आहेत.
श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर, भाजी मार्केट ते श्री अल्लमप्रभू मंदिर आदी ठिकाणच्या किनाऱ्यावर माशा तरंगत आहेत. मृत होणाऱ्या माशांमध्ये छोटे तसेच मोठ्या माशांचा समावेश आहे. प्रदूषित पाणी तलावात मिसळल्यामुळे तलावातील ऑक्सिजन कमी झाले असावे. ऑक्सिजन मिळत नसल्याने श्वास घेताना अडचणी निर्माण होऊन मासे मेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते. वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी अधिक गरम होते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होते. त्यात पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन आणखी कमी होते. त्यामुळे माशांचा मृत्यू होऊ शकतो. मासे मृत होण्यापासून वाचविण्यासाठी तलावातील ऑक्सिजन वाढणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.