शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गण गण गणात बोतेच्या जय घोषात हजारो भाविकांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन,सोरेगावच्या मंदिरात भाविकांची गर्दी

By appasaheb.patil | Updated: February 13, 2023 14:06 IST

Solapur News: शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती.

दरम्यान, मंदिरात गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे व कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर यांनी श्रीं.च्या मुर्तीस दुग्धपंंच्यामृत महाअभिषेक व महारुद्र पुजा करण्यात आली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण, महाराजांची बावन्नी,अष्टक, २१ दुर्वांकुरानी पारायणची सांगता, शोभा साठे यांच्या हस्ते झाली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त व भक्तगणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालास गोकाक, विजयकुमार रघोजी ,सुहास गुडपल्ली, तुकाराम जाधव नारायण जोशी तसेच महेश अक्कलकोट पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वीरभद्र माळगे, अविनाश केतकर, तुकाराम सोनाळे, हेमंत परळिकर हेमंत वैद्य, मधुसूदन क्षिरसागर, मोहन भालवणकर,वर्षा भावार्थी, उज्वला खरात आधी जण उपस्थित होते.

सजावटीसाठी दोन टन फुलांचा वापर...मंदिरात सुमारे दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. पांढरा, केसरी, पिवळी जरबेरा, आँरकीड झेंडू , गुलाब आधी विविध फुलांचा वापर करून मोठ्या खुबीने सजावट करण्यात आली होती .त्यामुळे मंदिर व गाभाऱ्याला अधिक आकर्षकता प्राप्त झाली होती. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी संस्कार भारतीचे कलाकार अनंत देशपांडे व विनायक बोड्डू यांनी सभागृहात आकर्षक रांगोळी साकारली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरGajanan Maharajगजानन महाराज