शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

विचार अन् भावनांचे आऊटलेट ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 14:04 IST

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आऊटलेट चांगले आहे कारण मनातील विचार, भावना, समस्या महिला एकमेकांजवळ बोलून दाखवतात.

भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर टीव्ही चॅनलने परिचर्चा घडवून आणली. त्यात बोलताना भैय्यूजी महाराजांचे मित्र अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वत: एक आध्यात्मिक गुरू होते, परंतु ते एक व्यक्ती पण होते, आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्याजवळ आऊटलेट नव्हता. इतकं महत्त्वाचं असतं का हे आऊटलेट? होय...

कोट्यवधी रुपये खर्च करून  उजनी धरण बांधले आणि समजा त्याला आऊटलेटच दिले नसते तर काय झाले असते ? अक्षरश: धरण फुटले असते व गावोगावे नष्ट होऊन न भरून निघणारी मानव व संपत्ती हानी झाली असती इतकं महत्त्वाचं असते. मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्त्वापासून सांधलेलं जणू एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे धरण फुटेल की राहील ? हे होऊ नये म्हणून आऊटलेट महत्त्वाचे आहे. माणसाची सध्याची स्थिती ती धावत्या आगगाडीसारखी आहे. प्रत्येक क्षणाशी तो संघर्ष करत आहे. त्यामुळे मनातील विचार, भावना, भावना बाहेर काढण्यासाठी त्याला वेळच नाही. मनातील विचार व भावना किंवा समस्या बाहेर काढायच्या असतील तर एकमेकांशी संवाद, बोलणं केलं पाहिजे. अनेकवेळा आपण स्वत:शीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरुवात करते. त्यात भुतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात, काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध.

उलट-सुलट, सुसूत्र - विस्कळीत, उपयोगी- निरुपयोगी, हवेसे-नकोसे विचार कोणत्याही क्रमाने मनात सतत एकापाठोपाठ येत असतात. असे सतत बडबडणारे मन सोबत घेऊनच आपण दिवसांचा प्रवास करत असतो. हे नुसतेच विचार असले असते तर ठीक आहे, पण मनात येणाºया या विचारांच्या पाठोपाठ मनात त्याप्रमाणे भावना, समस्या तयार होतात आणि त्या भावनांच्या व समस्यांच्या प्रमाणे आपली मानसिकता बदलत जाते.

आॅफिसात झालेले भांडण, रिक्षावाल्याशी झालेली बाचाबाची किंवा वाटेत पंक्चर झालेली गाडी, या सगळ्या गोष्टींचा राग बरेच जण घरी आल्यानंतर बायको अथवा मुलांवर काढताना दिसतात. अनेक लोक कोणत्या ना कोणत्या अव्यक्त भावनांच्या, समस्यांच्या ओझ्याचा भार वाहताना दिसतात, परंतु त्या भावना, समस्या कोणत्या आहेत हेच त्यांना उमगत नाही. आजच्या धावपळीच्या युगात कोणी सुखी नाही, असे आपण म्हणतो. दु:ख, निराशा, राग, भीती तसेच अपराधी भावना यांचा भडीमार काही जण स्वत:च्या कुटुंबीयांवर करून वैवाहिक जीवन अस्थिरता निर्माण करत असतात. आनंद, प्रेम, राग, आपुलकी, निंदा, भीती, निराशा या प्राथमिक स्वरूपाच्या भावना असून, त्यांना किती वेळ द्यावा, हे प्रत्येकाने आपापले ठरविले पाहिजे. आपल्या मनातील भावनांना व समस्यांना आपण स्वत:हून वाट करून दिली पाहिजे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आऊटलेट चांगले आहे कारण मनातील विचार, भावना, समस्या महिला एकमेकांजवळ बोलून दाखवतात किंवा रडून-रडून त्यांच्या डोक्यातील विचार निघून जातात, परंतु पुरुषांचे तसे नाही सर्व गोष्टी आतल्याआत साठवून ठेवतात. ते आऊटलेटचा वापरच करत नाहीत. मित्रांनो, म्हणून आपलं आऊटलेट सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे आऊटलेट वापरून आपल्या समस्या, भावना, विचार आपल्या जवळच्यांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं आऊटलेट ओपन करण्यासाठी विपश्यना, ध्यान साधनेचा अवलंब करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं आऊटलेट म्हणजे आपले डोळे...उघडा फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध... वाहून जाऊद्या स्ट्रेस, दु:ख, उपेक्षा... पिस्तूलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा,  हे केव्हाही सोप्पं...नाही का?- प्रा. तात्यासाहेब काटकर(लेखक शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत)  

टॅग्स :Solapurसोलापूर