शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं त्यांना स्वर्गात जागा मिळणार, शहाजीबापू पाटलांचं अजब वक्तव्य; दीपक साळुंखे-पाटलांवरही सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:47 IST

शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदासह १५ सदस्य प्रचंड मतांनी निवडून ન एकहाती सत्ता दिल्याबद्दल शिंदेसेनेच्या वतीने विजयी सभेत शहाजी बापू बोलत होते.

सांगोला : स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कोठेतरी चेपला म्हणून जातोय सांगोला शहरातील जनतेच्या स्वाभिमानासाठी सर्व ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवून नगर परिषदेवर भगवा फडकविला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो नगर परिषद निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं. त्यांना स्वर्गातच उद्या जागा मिळणार असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. सांगोला नगरपालिका निवडणुकीत मी नसतो तरी तुम्ही निवडून आला असता २०१६ राणी माने नगराध्यक्ष झाल्या म्हणून २०१९ साली मी आमदार झालो आणि २०१९ साली मी आमदार झालो म्हणून आनंदा माने तुम्ही आता नगराध्यक्ष झालात. कदाचित मीही तुमच्यासोबत नसतो तर आनंद माने तुम्ही निवडून आला असता, असेही शहाजी पाटील म्हणाले. गणपतराव देशमुख व मी कायम एका विचारधारेवर काम केल्याचे ते म्हणाले.

शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदासह १५ सदस्य प्रचंड मतांनी निवडून ન एकहाती सत्ता दिल्याबद्दल शिंदेसेनेच्या वतीने विजयी सभेत शहाजी बापू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नूतन नगराध्यक्ष आनंदा माने, नूतन १५ नगरसेवक नगरसेविका, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, दादासाहेब लवटे, सागर पाटील, विजय शिंदे, सुभाष इंगोले, प्रा. संजय देशमुख, माजी नगरसेवक सतीश सावंत, गुंडा खटकाळे, सोमेश यावलकर आदी उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले, सांगोला शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढाई होती. सांगोल्याची ओळख महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी असून या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने कोण जर राजकारण करणार असाल तर सांगोल्यातील जनता कधीही खपवून घेणार नाही. भाजपसोबत आली असती तर निम्मेला निम्म्या जागेला भागीदार झाली असती; परंतु पालकमंत्र्यांना पटविण्यात दीपक साळुंखे-पाटलांसह भाजप नेते यशस्वी झाले तरीही यापुढे मी महायुतीशी प्रामाणिक राहणार आहे. चिंतन करण्यापेक्षा मन साफ करा, असा सल्ला त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजी बापूंनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Heaven for voters of 'bow and arrow', says Shahajibapu Patil.

Web Summary : Shahajibapu Patil claims heaven awaits voters of Shiv Sena's 'bow and arrow' symbol. He criticized Deepak Salunkhe-Patil and emphasized Sangola's independent spirit, highlighting development projects secured after meeting Eknath Shinde. He affirmed commitment to the Mahayuti alliance, advising leaders to purify their intentions.
टॅग्स :SolapurसोलापूरShiv Senaशिवसेना