ग्राम सुरक्षा रक्षकांच्या हाती काट्या अन् शिट्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:25+5:302021-09-22T04:25:25+5:30

हा कार्यक्रम बार्शी तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या हस्ते व तालुका उपपोलीस निरीक्षक शिवाजी ...

Thorns and whistles in the hands of village security guards | ग्राम सुरक्षा रक्षकांच्या हाती काट्या अन् शिट्ट्या

ग्राम सुरक्षा रक्षकांच्या हाती काट्या अन् शिट्ट्या

Next

हा कार्यक्रम बार्शी तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या हस्ते व तालुका उपपोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी बार्शी तालुक्यातील १४ गावांतील ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना काट्या व शिट्ट्या वाटप करण्यात आले. यावेळी बार्शी पोलीस जाणीव सेवा संघाचे तालुका विभागप्रमुख उमेश आणेराव, उपविभाग प्रमुख समाधान विधाते, तालुका अध्यक्ष राहुल वाणी, बळेवाडी शाखाप्रमुख सम्मेद तरटे, सदस्य दीपक ढोणे, सागर घंटे, डॉ. सुहास राऊत, बार्शी तालुका पोलीस सर्जेराव गायकवाड, हर्षवर्धन वाघमोडे, कांतीलाल लाड आदी उपस्थित होते.

...........

फोटो ओळी : ग्राम सुरक्षा दलातील रक्षकांना काट्या व शिट्ट्या वाटप करताना अभिजित धाराशिवकर, शिवाजी जायपत्रे आदी.

........

२१ बार्शी पोलीस

Web Title: Thorns and whistles in the hands of village security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.