काटेरी झुडपं.. अस्ताव्यस्त फांद्या अन् शेळ्यांचा वावर कार्यालयासमोर चक्क दसºयाच्या धुण्याची वाळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 08:16 PM2019-09-28T20:16:13+5:302019-09-28T20:18:38+5:30

एक अधिकारी, एक कर्मचारी : कुर्डूवाडीच्या उत्पादन शुल्क कार्यालयाची अशीही तºहा

Thorns and shrubs. The drying of ten debris in front of awkward branches and goat's yard | काटेरी झुडपं.. अस्ताव्यस्त फांद्या अन् शेळ्यांचा वावर कार्यालयासमोर चक्क दसºयाच्या धुण्याची वाळवण

काटेरी झुडपं.. अस्ताव्यस्त फांद्या अन् शेळ्यांचा वावर कार्यालयासमोर चक्क दसºयाच्या धुण्याची वाळवण

Next
ठळक मुद्देकुर्डूवाडी येथील भैय्याच्या रानाकडे व जुन्या प्रांत कार्यालयात महाराष्ट्र उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालय कार्यरतमाढा व करमाळा या दोन तालुक्यातील बीअर शॉपी, परमिट रुम व वाईन शॉपीसह इतर कार्यभार या कार्यालयातून चालतो

लक्ष्मण कांबळे 

कुर्डूूवाडी : आजूबाजूला सुमार वाढलेली काटेरी झुडपं... अस्ताव्यस्त फांद्या... पावसामुळं माजलेलं गवत... मध्ये कार्यालयाची इमारत... समोरच वळण बांधून दसºयाच्या धुण्याची वाळवण.. कार्यालयात जबाबदार असं कुणीच नाही.. बाजेवर शेळ्या राखणारा एक मनुष्य हे चित्र आहे कुर्डूवाडीच्या उत्पादन शुुल्क विभागाच्या कार्यालयाचे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला ‘आॅन दि स्पॉट’मध्ये  हे चित्र दिसून आलं. 

कुर्डूवाडी येथील भैय्याच्या रानाकडे व जुन्या प्रांत कार्यालयात महाराष्ट्र उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालय कार्यरत आहे. माढा व करमाळा या दोन तालुक्यातील बीअर शॉपी, परमिट रुम व वाईन शॉपीसह इतर कार्यभार या कार्यालयातून चालतो. येथे एक उपनिरीक्षक अन् कॉन्स्टेबल यांच्यावर इथला कारभार चालत असल्याचं समजलं. आज दुपारी एक वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने येथील कार्यालयात व आवारात अचानकपणे केलेल्या पाहणीत काटेरी झुडपे येथील वृक्षतोडीतील अस्ताव्यस्त फांद्या,कार्यालय प्रमुखाच्या केबिन समोर परिसरातील नागरिकांची वाळत असलेली दसºयाची धुणी,आवारात चरत असलेल्या असंख्य शेळ्या व एक व्यक्ती इमारतीच्या बाहेर असलेल्या बाजेवर असलेल्या कॉन्स्टेबलची वाट पाहत बसलेला प्रथम कार्यालयाच्या गेटमधून आत प्रवेश करताच दिसून आले. 

प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता त्यावेळी तेथील प्रमुख उपनिरीक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. बाहेर उपस्थित असणाºया व्यक्तीने फोन करुन पत्रकार आल्याचे सांगताच कॉन्स्टेबल काही वेळातच हजर झाले. यावेळी प्रथम उपस्थित असलेल्या शेळ्या चारणाºया व्यक्तीला विचारले असता त्याने दररोज शेळ्या चारत असून माझ्याकडेच या कार्यालयाकडे लक्ष ठेवण्याचे काम साहेबांनी दिले असल्याचे सांगितले. काही वेळातच कॉन्स्टेबल तिथे आले. यादरम्यान उपस्थित असलेला व्यक्ती ताबडतोब निघून गेल्याचे दिसून आले.

शेळ्या राखणारा व्यक्ती कायम पंच
- यानंतर पाहणी केली असता उपनिरीक्षक भोईर यांची केबिन कुलूपबंद असल्याचे दिसून आले. तर बाजूच्या कार्यालयात पंढरपूरच्या कर्मचाºयांनी लावलेला फिरता पंखा, रिकाम्या खुर्च्या, दोन मोटरसायकली, एक लोखंडी व एक प्लास्टिकचा अशा दोन पिंपा आतमध्ये दिसून आल्या. बाहेरील   बाजूची खोली बंद आसल्याचे यावेळी जाणवले. त्यावेळी व्हरांड्यातून संरक्षण भिंतीच्या एक आवारात नजर टाकली असता चरत असलेल्या शेळ्या,अनेक दिवसांपासूनच्या जुन्या दोन कार, एक ट्रक, एक टँकर, अनेक बॅरल, एक कारवाई केलेली बोट परिसरात अस्ताव्यस्त दिसून आली. यावेळी शेळ्या चारणाºया व्यक्तीने ‘आपणच कायम पंच म्हणून काम करीत असतो’ असं सांगितलं. 

आमचे काम हे फिल्डवरचे असल्याने आम्हाला कायम बाहेरच काम करावे लागते. त्यात माझ्या कार्यालयात एक कॉन्स्टेबल व मी असे दोघेच असतो. त्यात काही काम अचानक निघाले की तिथे थांबायला कोणीच नसते. त्यामुळे आम्ही कार्यालयात गैरहजर असल्याचे इतरांना दिसून येते. शासन नियमानुसार आम्ही दुकानदारांकडून वार्षिक शुल्क आकारतो.
- पी. टी. भोईर, उपनिरीक्षक,महाराष्ट्र उत्पादक शुल्क कुर्डूवाडी

Web Title: Thorns and shrubs. The drying of ten debris in front of awkward branches and goat's yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.