शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 23:25 IST

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची.

सोलापूर/मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. आता, तब्बल 15 दिवसांनी शहाजी बापू पाटील त्यांच्या सांगोला मतदारसंघात परतले आहेत. त्यावेळी मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हलगीच्या तालावर, फटक्यांची आतिषबाजी झाली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 वर्षे टिकणार असे भाकीत केले.

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. गुवाहाटीला एकनाथ शिंदेंचा मावळा म्हणून मी कालची लढाई करत होतो. पण, आमच्या या लढाईत मी एक सेकंदही विचलित झालो नाही. एकनाथ शिंदेंना पांडुरंग मुख्यमंत्री करणार हे मला माझा देव सांगत होता. शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच चांगलं काम करेल, असा मला विश्वास आहे. शरद पवारांचा काय आपल्याला नवा अनुभव आहे व्हय, 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आपल्याला. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल, पण पुढील 15 वर्षे हेच सरकार राहणार, असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी आपल्या फोनकॉलमधील संभाषणातही राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर अजित पवार यांना दरारा आहे, त्यामुळे मी फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाच तेवढं घाबरतो, असेही ते म्हणाले होते. आता, शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित केल्यानंतर त्यांनी हे सरकार 15 वर्षे सत्तेत राहिल, असे म्हटले आहे. 

कार्यकर्त्यांचा गराडा, जल्लोषात स्वागत

आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्ते सांगोल्यात नाचताना दिसून आले. 

अजित पवारांनीही विधानसभेत केला उल्लेख

दरम्यान, राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. त्यामुळे, शिवसेनेतील बंडखोर आमदाराचं हे बंड यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. तर, अजित पवारांनीही तुफान फटकेबाजी केली. यावेळी, त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगवरही भाष्य केलं होतं. त्यामुळे, शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे फॅन फॉलोविंग वाढले आहे. आता, आपल्या गावी आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. 

टॅग्स :sangole-acसांगोलाMLAआमदारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे