तीस वर्षीय महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST2021-02-11T04:24:14+5:302021-02-11T04:24:14+5:30

पीडित ३० वर्षीय महिला २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जनावरांना गवत आणण्यासाठी घराशेजारील शेतात गेली होती. ती गवत काढत असताना ...

Thirty-year-old woman tortured | तीस वर्षीय महिलेवर अत्याचार

तीस वर्षीय महिलेवर अत्याचार

पीडित ३० वर्षीय महिला २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जनावरांना गवत आणण्यासाठी घराशेजारील शेतात गेली होती. ती गवत काढत असताना अचानक तिच्या पाठीला कोणीतरी हाताने स्पर्श केल्याने तिने दचकून मागे वळून पाहिले. यावेळी समाधान हांडे मागे उभा होता. त्याने पीडितेला तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत चल, असे म्हणून तिला मकाच्या शेतात जबरदस्तीने ओढून नेले. तिने आरडाओरड करताच त्याने तिचे तोंड दाबून गप्प बस, इथे तुला वाचवायला कोणी येणार नाही. गप्प बस नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने पीडितेच्या भाच्याने त्या ठिकाणी धाव घेऊन समाधान यास पकडून ओढले. यावेळी त्याने त्याच्या हाताला हिसडा मारून तेथून धूम ठोकली. घडला प्रकार पीडितीने पतीला फोनवरून सांगितला.

Web Title: Thirty-year-old woman tortured