शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात साकारलेली तिसरी विहीर झाली खुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 10:53 IST

शिवप्रेमींच्या श्रमदानाचे फळ; बांधकामाचा उत्कृष्ट नमुना, संवर्धनाची गरज

ठळक मुद्दे तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जातेविहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेतही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे

सोलापूर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात तयार झालेली विहीर काटेरी झुडपांमध्ये दडली होती. ही विहीर आता पाहण्यासाठी मोकळी झाली. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे इतिहास अभ्यासक सांगत आहेत. 

केंद्र शासनाच्या निधीतून भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्यातील काटेरी झुडपे हटविण्यात आली. सोलापुरातील सामाजिक संघटनांनी यासाठी आठवड्यातून एकदा श्रमदान केले. राज्याच्या विविध भागातील शिवप्रेमी यात सहभागी झाले. झाडीझुडपे हटविण्यासाठी बरेच श्रम करावे लागले. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी झटले. अद्याप बरेच काम बाकी असले तरी या मोहिमेतून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. 

भुईकोट किल्ल्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दस्तावेजात त्याची नोंद आहे.  काटेरी झुडपांमुळे आणि पडझड झाल्यामुळे त्या झाकोळल्या   गेल्या आहेत. नव्या स्वच्छता अभियानामुळे अशा अनेक वास्तू इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी  खुल्या होत आहेत. त्यापैकीच एक म्हणून तिसºया विहिरीकडे पाहता येईल. 

भुईकोट किल्ल्यात  एकूणच चार विहिरी आहेत. बाळंतीण आणि नागबावडी या दोन विहिरी खुल्या आहेत. मल्लिकार्जुन मंदिरासमोर तिसरी विहीर असल्याचे सांगितले जायचे. मात्र लोकांना तिथे पोहोचता येत नव्हते.स्वच्छता अभियानामुळे ही विहीर खुली झाली आहे. भोवताली बरीच स्वच्छता करून घेण्यात आली  आहे. 

अभ्यासकांच्या नजरेतून या विहिरीचे वैशिष्ट्य - इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर म्हणाले, तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेत. ही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे. विहिरीच्या भोवती कठडा नाही. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील बाजूस असणारी ही विहीर विजापूरच्या आदिलशहाच्या काळात १६५३ साली तयार झाली आहे. विहिरीवर एक शिलालेख होता. त्यावरही याबाबतची नोंद आहे. 

किल्ल्यात जलव्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. किल्ला बांधताना पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून किल्ल्यातच विहीर आणि बारवाचे बांधकाम केले जात असे. बाळंतीण विहिरीतून खापरी पन्हाळीद्वारे किल्ल्यात जागोजागी पाणीपुरवठा होत होता. मध्ययुगीन काळात आधुनिक पुलाच्या बाजूला नागबावडी ही विहीर झाली. गोड्या पाण्याची विहीर पाहण्यासाठी खुली होणे खूप महत्त्वाचे आहे. आता या विहिरीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.  -नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Solapurसोलापूरhistoryइतिहास