शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला मास्क बांधून चोरट्यांनी मंद्रुप बाजारपेठेतील अकरा दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 08:30 IST

सीसीटीव्ही कॅमेरे उचकटून फक्त रोकड पळवली; शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली घटना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील निबंर्गी रोडवर असलेली अकरा दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड पळविली. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही चोरी उघडकीस आल्यावर मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान,  शुक्रवार हा मंद्रूपच्या आठवडी बाजाराचा दिवस, पण कोरोना साथीमुळे सध्या बाजार भरत नाही. तरीही सध्या दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे व्यापारी पहाटे पाच वाजता उठून तयारीसाठी गेल्यावर त्यांना दुकाने फोडली असल्याचे लक्षात आले. मंद्रूप बाजारपेठेत निंबर्गी रोडवर ओळीने खत, सिमेंट, किराणा, मोबाईल विक्रीची दुकाने आहेत. यातील पाच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय आहे. तरीही चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधून ही दुकाने फोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणावरून दिसून आले आहे.

चोरट्यांनी घराशेजारील दुकाने शाबूत ठेवून रस्त्याकडेच्या दुकानावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. दुकाने फोडून आतील फक्त गल्यातील रोकड लुटून नेली आहे. दुकानातील इतर मालाला चोरट्यांनी हाती लावला नसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे. व्यापाऱ्यांनी माहिती देताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे चोरट्यांना दुकानातील सीसी कॅमेराची कल्पना आली होती. जाताना त्यांनी सीसीकॅमेर्‍याची मोडतोड केल्याचेही दिसून आले आहे. कोरोना साथीमुळे गेले तीन महिने व्यापार ठप्प होता एक जून नंतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल भरून व्यापार चालू ठेवण्यास सुरुवात केली असतानाच चोरट्यांनी आता दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMarketबाजारSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस