चोरट्याचे नाव बोगस असल्याचे निष्पन्न
By Admin | Updated: November 19, 2014 23:23 IST2014-11-19T22:38:34+5:302014-11-19T23:23:59+5:30
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल--सोलापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे असण्याची शक्यता असून

चोरट्याचे नाव बोगस असल्याचे निष्पन्न
सांगली : येथील शंभर फुटी रस्त्यावरील लक्ष्मी नारायण कॉलनीमध्ये नागरिकांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रहीम वजीर शेख (वय ६०, रा. हिप्परगी, ता. सांगोला) याला आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, शेख आपले नाव बोगस सांगत असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. रहीम शेख हा लक्ष्मी नारायण कॉलनीमध्ये चोरी करीत असताना नागरिकांना रंगेहात पकडले होते. यावेळी उडालेल्या झटापटीत त्याने अभिमन्यू लाडेसह दोघांवर लोखंडी गज व स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहीम शेख याने सोलापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेख हा आपले नाव खोटे सांगत असून, पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. ते म्हणाले की, तपास कामात अडथळा निर्माण्
ा करण्यासाठी तो बोगस माहिती देत आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्याचे गुन्हे स्पष्ट होणार आहेत. याबाबत अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
ओळख पटवण्याचे काम
रहीम शेख याने सोलापूर जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून, तो नेहमी वेगवेगळी नावे वापरत आहे. सांगलीतील घरफोडी प्रकरणीही त्याने आपले नाव बोगस सांगितले आहे. त्याचे ओळखपत्र आणण्यास त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले आहे.