शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरीसाठी आलेल्या चोरट्यानं पळून जाताना घरमालकाचा डोळा फोडला, सोलापुरातील घटना

By विलास जळकोटकर | Updated: May 12, 2024 17:51 IST

यश नगरातील प्रकार : अंगणात झोपलेले जागे झाले अन् बेत फसला

सोलापूर : चोरी करण्याच्या उद्देशानं चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात प्रवेश केला. घरामध्ये जाताना घरामालक आणि भाडेकरुला जाग आली. पळून जाणाऱ्या चोरट्यानं हातातली लोखंडी वस्तू भिरकावून घरमालकाच्या डोळ्यावर मारुन जखमी केले. हा फिल्मीस्टाईल प्रकार अक्कलकोट रोडवरील यशराज नगरात पहाटे अडीचच्या सुमारास घडला. नागनाथ दत्तात्रय महाजन (वय- ७३) असे जखमीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी अक्कलरोड येथील यशराज नगरात राहतात. वाढत्या उकाड्यामुळे ते व त्यांचे भाडेकरु अंगणात झोपलेले होते. 

पहाटे अडीचच्या सुमारास एक अनोळखी २५ ते ३० वयोगटातील तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात आला. आवाजानं अंगणात झोपलेले फिर्यादी आणि भाडेकरुंना जाग आली. घराच्या दरवाजाची तोडफोड करुन आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. जागी झालेल्या फिर्यादीने आवाज दिल्याने चोरट्यानं घाबरुन पळ काढताना फिर्यादीच्या दिशेने हातातील लोखंडी वस्तू भिरकावून मारली. यात फिर्यादीचा डोळा निकामी होऊन जखम झाली. एव्हाना चोरटा पसार झाला. सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला असून तपास सपोनि सोळुंके करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरtheftचोरी