पंढरीत ‘माघी’यात्रा होणार पण नियम, अटीनुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:08+5:302021-02-05T06:47:08+5:30

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास (पंढरपूर) येथे घेण्यात आली. ...

There will be a 'Maghi' yatra in Pandharpur but according to the rules and regulations | पंढरीत ‘माघी’यात्रा होणार पण नियम, अटीनुसारच

पंढरीत ‘माघी’यात्रा होणार पण नियम, अटीनुसारच

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास (पंढरपूर) येथे घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर-देशमुख, ह.भ.प. माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, शासनाने २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे परंपरेचे नियम होणार आहेत. मंदिराबाहेरच्या विषयासंदर्भात शासन निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो ::::::::::::::::::::::::

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करताना सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व अन्य सदस्य. (सचिन कांबळे)

Web Title: There will be a 'Maghi' yatra in Pandharpur but according to the rules and regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.