स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी झटलो

By Admin | Updated: June 26, 2014 01:28 IST2014-06-26T01:28:00+5:302014-06-26T01:28:00+5:30

आयुक्त गुडेवार: नगरोत्थान रस्ते रद्द केल्यामुळे ५० कोटी वाचले

There was nothing to selfish, just look for the city | स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी झटलो

स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी झटलो


सोलापूर: माझा स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी काम केले़ शहरातील ११ महिन्यांतील सेवा इतिहासात नोंद करण्यासारखी आहे़ शहरवासीयांनी खूप प्रेम केले़ काही कटू निर्णय घेतल्यामुळे काही जण नाराज होणार हे माहीत होते़ नगरोत्थान रस्ते योजनेतील २३८ कोटींचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनपाचे ५० कोटी रुपये वाचले़ हा निर्णय मला अडचणीचा ठरणार असे दिसले होते तरीही मी शहराचे हित पाहिले, असे मत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केले़
नगरोत्थान रस्ते कामाचे २३८ कोटींचे टेंडर युनिटी इन्फ्रा यांना दिले होते़ मनपाकडून अतिक्रमण काढणे होत नाही, भूसंपादन होत नाही, जलवाहिनी शिप्ट करणे, पोल शिप्ट करणे वेळेत होत नसल्यामुळे रस्त्याची ही कामे रखडली आहेत त्यामुळे काही काम नसताना मक्तेदाराला प्राईस एक्सलेशनचा लाभ द्यावा लागत होता त्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत सध्याची सुरू कामे संपवून नवीन कोणतीही कामे घेऊ नयेत असे सुचविले आहे़ रस्त्याचे हे टेंडर रद्द केल्याचे आयुक्त म्हणाले़ उर्वरित कामे पुन्हा रिटेंडर काढून केली जातील यामुळे मनपाचा किमान ५० कोटींचा फायदा होईल असेही गुडेवार म्हणाले़
दोन दिवसांच्या बैठकानंतर गुडेवार बुधवारी दुपारी शहरात आले होते़ महापालिकेत न येता त्यांनी निवासस्थानी बसून अनेक फाईलींचा निपटारा केला़ गेल्या ११ महिन्यात अनेक कामे करता आली; मात्र पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि १०० कोटींचे थीर्म पार्क उभारणे हे काम राहून गेले़ शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यास केंद्राने मंजुरी दिली असून तसे मत्र मनपाला प्राप्त झाल्याचे आयुक्त म्हणाले़ माझ्या अनेकवेळा बदल्या झाल्या आहेत़ एक वर्षात मी तीन वर्षाएवढे काम केले आहे़ बदलीमुळे कौटुंबिक त्रास होतो असे ते म्हणाले़ मी पुण्याला बदली मागितली असून शासन लवकरच याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले़
-----------------------
गुडेवारांसाठी आज सोलापूर बंद
सोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची वर्षभरात झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी गुरुवारी सत्ताधारी पक्ष वगळता सर्व विरोधकांनी सोलापूर बंद जाहीर केला आहे़ बंदची जोरदार तयारी केली असून, दोन्ही मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहेत़ दिवसभर बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत़ हा बंद मोडून काढा, असे आवाहन काँग्रेसने केल्यामुळे बंद कितपत यशस्वी होतो, याकडे लक्ष लागले आहे़ एस़ टी़ स्टॅण्ड तसेच शिवाजी चौक परिसर १०० टक्के बंद ठेवणार असून, गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केले आहे़ शिवाजी चौकातून दत्त चौक येथे कार्यकर्ते मोर्चाद्वारे सकाळी १० वाजता येतील तर पूर्व भागातून कामगार नेते आडम मास्तर दत्त चौक येथे येतील़ मेकॅनिकी चौकातून दोन्हीही मोर्चे विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून गुडेवारांची बदली रद्द करावी, यासाठी निवेदन देतील अशी माहिती चंदनशिवे यांनी दिली़
-------------------------
बंदमध्ये कारखानदार आणि विडी कारखाने
आयुक्तगुडेवार यांच्यामुळे शहरात अनेक चांगले बदल होत आहेत़ त्यांनी मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच शहरात मूलभूत सुविधा करण्यासाठी खूप प्रयत्न केले़ त्यांच्यासाठी पूर्व भागातील यंत्रमाग कारखाने आणि विडी कारखाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले़
-------------------------
नागरिकांनी सामील व्हावे़
सत्ताधारी पक्षातील काहींंनी गुडेवारांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याला शहर मुकले आहे़ त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी सोलापूर बंदची गुरुवारी हाक दिली आहे़ नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि हा निर्णय हाणून पाडावा,असे आवाहन आ़ विजयकुमार देशमुख, आडम मास्तर, प्रताप चव्हाण, आनंद चंदनशिवे आदींनी केले आहे़
------------------------
येणे लांबणीवर
गुडेवार यांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी शहरात आंदोलने सुरू झाली आहेत़ गुरुवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे त्यामुळे नवे आयुक्त अजित जाधव यांचे येणे लांबणीवर पडले आहे़ बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत़ गुडेवार दोन दिवस तरी सोलापुरातच असून त्यांनी कामकाज सुरू ठेवले आहे़

Web Title: There was nothing to selfish, just look for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.