शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; सोलापुरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही; पण प्रत्येकाला दक्षता घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:13 IST

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन : गरजेशिवाय बाहेर पडणाºयांवर होईल कारवाई

ठळक मुद्देआयसोलेशन सेंटरमध्ये असलेल्या १७ रुग्णांचे रिझल्ट निगेटिव्ह आलेजिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, पण यापुढेही गंभीर दक्षता घेणे गरजेचे लोकांनी घराबाहेर पडू नयेत, यासाठीआवश्यक ती काळजी घ्यावी

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे़ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाºयांशी व्हिसीवर संवाद साधत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत़सोलापूरकरांनी संचारबंदीचे पालन करावे अशा सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आयसोलेशन सेंटरमध्ये असलेल्या १७ रुग्णांचे रिझल्ट निगेटिव्ह आलेले आहेत़ जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, पण यापुढेही गंभीर दक्षता घेणे गरजेचे असून, लोकांनी घराबाहेर पडू नयेत, यासाठीआवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले़ संचारबंदी काळात औषधे आणि इतर अत्यावश्यक सेवेत कमतरता येऊ नये, याची चर्चा व्हिसीवर झाली आहे़ यासंदर्भात आवश्यक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला आहे़ गरजेशिवाय बाहेर पडणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली.

दोन महिने पुरेल इतके धान्य उपलब्ध- जिल्ह्यात दोन महिने पुरेल इतक ा धान्यसाठा शिल्लक आहे़ त्यात गहू ६ हजार १७२ मेट्रिक टन, तांदूळ ३ हजार २८१ मे़ टन,साखर १५० मे़ टन, डाळ १२५ मे़ टन इतका धान्यसाठा शासनाकडे उपलब्ध आहे़ तर खुल्या बाजारात एक महिन्याचा धान्य साठा उपलब्ध आहे़ गहू २३ हजार ७०० मे़ टन, तांदूळ २९ हजार १२१ मे़ टन, साखर २ हजार ८५० मे़ टन, ज्वारी ३६ हजार ३५० मे़ टन, डाळ १४ हजार ९१० मे़ टन, खाद्यतेल १ लाख ७४ हजार ५५० लिटर उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल