शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांना मागास ठरविणारे अनेक पुरावे आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:17 IST

लवकरच पडताळणी होणार असल्याची माहिती डॉ़  सर्जेराव निमसे यांनी माहिती दिली़

ठळक मुद्देनिजामाच्या काळातील पुरावा सादर करण्यात आला न्यायालयात टिकेल असा भरभक्कम अहवाल शासनाला लवकरच सादर करू

सोलापूर : मराठा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे अनेक पुरावे लोक दाखल करीत आहेत. मराठवाड्यात झालेल्या सुनावणीवेळी निजामाच्या काळातील पुरावा सादर करण्यात आला आहे. त्याची पडताळणी होईल, असे राज्य मागासवर्गीय आयोगाचे तज्ज्ञ सदस्य सर्जेराव निमसे यांनी सांगितले. न्यायालयात टिकेल असा भरभक्कम अहवाल आम्ही शासनाला लवकरच सादर करू, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  डॉ. निमसे म्हणाले, आयोगाने मराठवाडा, विदर्भातील सुनावणी पूर्ण केली आहे. ऐतिहासिक पुरावे, आकडेवारीच्या आधारे आम्ही सर्वंकष अहवाल सादर करणार आहोत.

मराठा आणि कुणबी समान असल्याचे पुरावे अनेक ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याची छाननी होईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या काही गावातील लोक एकमेकांचे नातेवाईक आहेत. विदर्भातील लोक कुणबी तर मराठवाड्यातील लोक मराठा आहेत. कुणबी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश आहे, त्यामुळे मराठा समाजाचाही ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, यासाठी या लोकांनी एकत्र पुरावे सादर केले आहेत. राज्यातील पाच संस्थांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल. 

२०० वर्षांपूर्वीचा हंडा डॉ. निमसे म्हणाले, औरंगाबादमध्ये झालेल्या सुनावणीवेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी २०० वर्षांपूर्वीचा भला मोठा हंडा ऐतिहासिक पुरावा म्हणून सादर केला. या हंड्यावर ‘औरंगाबाद कुणबी मराठा समाज’ असे लिहिलेले होते. यातून मराठा आणि कुणबी एकच आहेत, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

पावसाळ्यापूर्वी अहवाल पूर्ण करू- आयोगाने अतिशय गांभीर्याने यासंदर्भात काम करीत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व जिल्ह्यातील जनसुनावणी, सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच अहवाल सादर करू, असेही निमसे यांनी सांगितले. 

...पण जाहिरातबाजी करू नकामराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी करताना आयोग केवळ मराठ्यांच्या नव्हे तर सर्व समाजाचे म्हणणे ऐकून घेत आहे. प्रत्येकाला निवेदन देण्याचा अधिकार आहे. कुणालाही अडविण्याचा अधिकार नाही. मुळातच हा विषय संवेदनशील बनला आहे. ज्यांना मराठा आरक्षणाविरोधात निवेदन द्यायचे त्यांनी द्यावे; पण बाहेर जाऊन जाहिरातबाजी करू नये, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरmarathaमराठा