...तर निश्चितपणे कामाचा वेग वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:45+5:302021-02-05T06:47:45+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सोलापूरला रुजू झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यांनी ...

...तर निश्चितपणे कामाचा वेग वाढेल
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सोलापूरला रुजू झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यांनी सांगोला पंचायत समितीस भेट देऊन सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती राणी कोळवले, झेडपी सदस्य सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, पं.स. सदस्य नारायण जगताप, माजी झेडपी सदस्य संगम धांडोरे, मायाप्पा यमगर, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत दिलीप स्वामी यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), नरेगाअंतर्गत कामे, ग्रामपंचायतीकडील कर वसुली, १४ वा वित्त आयोग, जन सुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास योजना, अंगणवाडी इमारत व दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत जलजीवन मिशन, नळ जोडणी, समाजकल्याण विभागाकडील योजना, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग आणि उमेद कक्षाकडील योजनांचा आढावा घेतला.
चौकट
ग्रामपंचायत कर वसुली, शिक्षण विभागांतर्गत व्हिजन २०२२ करिता शिक्षक व केंद्र प्रमुखांकडून नावीन्यपूर्ण संकल्पना, उपक्रम प्रस्तावित करावेत. ज्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, त्यांनी पुढील दोन महिने शनिवार व रविवार सुटी न घेता जादा काम करून आपल्या विभागाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिल्या.