मोबाईल शॉपीतून साडेबारा हजारांच्या मुद्देमालाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:01+5:302020-12-14T04:35:01+5:30

सांगोला कचेरी रोडवरील मोबाईल टाॅवरशेजारी हे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. शॉपीचे मालक दुकानाच्या पाठीमागेच राहतात. रविवार पहाटेच्या सुमारास ...

Theft of twelve and a half thousand items from a mobile shop | मोबाईल शॉपीतून साडेबारा हजारांच्या मुद्देमालाची चोरी

मोबाईल शॉपीतून साडेबारा हजारांच्या मुद्देमालाची चोरी

सांगोला कचेरी रोडवरील मोबाईल टाॅवरशेजारी हे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. शॉपीचे मालक दुकानाच्या पाठीमागेच राहतात. रविवार पहाटेच्या सुमारास चोरट्याने शटरचे कुलूप तोडून शटर उचकटत असताना मालकास चोरीची कुणकुण लागल्याने त्यांनी दुकानाजवळ येताच चोरटा पळून गेला. दरम्यान, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्या चोरट्यास शहरातील वाढेगाव नाका येथे पकडले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. प्रारंभी मोबाईल शॉपीत चोरी झाली नाही, असे म्हणणाऱ्या मालकानेच दुपारी रोख ११०० रुपये, ४ मोबाईल असा १२ हजार ५७७ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या पाच परप्रांतीय चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: Theft of twelve and a half thousand items from a mobile shop