महाळुंग येथून तीन म्हशींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST2021-04-22T04:22:47+5:302021-04-22T04:22:47+5:30

हसन मतीन सौदागर या व्यापाऱ्याची (रा. आंबेडकर चौक, अकलूज) महाळुंग रोडलगत ताम्हाणे हॉटेलसमोर चार एकर शेती आहे. त्यावर कुटुंबाची ...

Theft of three buffaloes from Mahalung | महाळुंग येथून तीन म्हशींची चोरी

महाळुंग येथून तीन म्हशींची चोरी

हसन मतीन सौदागर या व्यापाऱ्याची (रा. आंबेडकर चौक, अकलूज) महाळुंग रोडलगत ताम्हाणे हॉटेलसमोर चार एकर शेती आहे. त्यावर कुटुंबाची उपजीविका भागवितो. तसेच जनावरांचा व्यापार करतात. घरगुती वापरासाठी म्हैस व गुरे सांभाळली आहेत. सदर जनावरांसाठी पत्राशेडचे बांधकाम केलेले आहे. सध्या त्यांच्याकडे ६ म्हशी व त्यांची लहान रेडकू, २ मोठ्या व ३ लहान गायी अशी जनावरे आहेत. १८ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास जेवण करून शेतात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी जनावरांना चारा टाकून शेतातच थोडावेळ थांबलो. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी झोपण्यासाठी आलो. त्यानंतर १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुन्हा शेतात जनावरांना चारा व म्हशीच्या धारा काढण्यासाठी गेलो असता गोठ्यामध्ये बांधलेल्या जनावरांपैकी ३ म्हशी नसल्याचे दिसले. म्हणून शेतात व आजूबाजूस म्हशींचा शोध घेतला. परंतु, मिळून आल्या नाहीत. म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Theft of three buffaloes from Mahalung