कुर्डूवाडीत कोविड रुग्णाच्या घरातून ६४ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:04+5:302021-05-16T04:21:04+5:30

सातव काॅलनी येथील राहणारे एका कुटुंबातील पाच व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात आले होते. १५ ...

Theft of Rs 64,000 from Kovid patient's house in Kurduwadi | कुर्डूवाडीत कोविड रुग्णाच्या घरातून ६४ हजारांची चोरी

कुर्डूवाडीत कोविड रुग्णाच्या घरातून ६४ हजारांची चोरी

सातव काॅलनी येथील राहणारे एका कुटुंबातील पाच व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात आले होते. १५ मे रोजी सकाळी सहा वाजता घरात चोरी झाल्याची माहिती संबंधित रुग्णास कळाली. शनिवारी त्या कुटुंबातील सदस्यांपैकी दोन व्यक्तीना डिस्चार्ज दिला गेला. त्यानंतर ते घरी आले असता घरातील रोख रक्कम व अंलकार असे ६४ हजारांची चोरी करून चोरटे पळून गेल्याची घटना निदर्शनास आली.

यात मंगळसूत्र, सोन्याचे गंठण, चार अंगठ्या, रोख रक्कम आठ हजार रुपये, भारत गॅसच्या दोन टाक्या ४ असा अंदाजे ६४ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याबाबत संतोष मिठ्ठुलाल लुंकड (रा. कुर्डूवाडी) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

----

Web Title: Theft of Rs 64,000 from Kovid patient's house in Kurduwadi