व्हळे शेलगाव येथे महावितरणच्या तारेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:21+5:302021-07-22T04:15:21+5:30

बार्शी : तालुक्यातील व्हळे शेलगाव येथील ग्रामीण महावितरणच्या उभे असलेल्या १४ सिमेंटच्या पोलची तोडफोड करून त्यावरील एक लाख २० ...

Theft of MSEDCL wire at Vhale Shelgaon | व्हळे शेलगाव येथे महावितरणच्या तारेची चोरी

व्हळे शेलगाव येथे महावितरणच्या तारेची चोरी

बार्शी : तालुक्यातील व्हळे शेलगाव येथील ग्रामीण महावितरणच्या उभे असलेल्या १४ सिमेंटच्या पोलची तोडफोड करून त्यावरील एक लाख २० हजार रुपयांची अल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत प्रधान तंत्रज्ञ सरिता गोविंद शेळके यांनी तालुका पोलिसांत तक्रार देताच अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हळे शेलगाव येथील शेतकऱ्यांनी आमच्या शेतातील पोलवर विजेच्या तारा नाहीत लाइट बंद असल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी करताना सर्किट नं. २ मधील पहाणी करताना २५ पोलमधील १८ पोलची तोडफोड करून १८ हजारांचे नुकसान व त्यावरील चार पदरी असलेली अल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

---

Web Title: Theft of MSEDCL wire at Vhale Shelgaon