प्राचीन जैन मंदिरातून मूर्तीची चोरी

By Admin | Updated: June 3, 2017 03:29 IST2017-06-03T03:29:18+5:302017-06-03T03:29:18+5:30

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात प्रसिद्ध असलेल्या देवनिंबर्गी येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या

Theft of idols from ancient Jain temple | प्राचीन जैन मंदिरातून मूर्तीची चोरी

प्राचीन जैन मंदिरातून मूर्तीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात प्रसिद्ध असलेल्या देवनिंबर्गी येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या पंचधातूच्या मूर्तीसह दोन मूर्ती भरदिवसा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चडचण तालुक्यातील देवनिंबर्गी येथील दिगंबर जैन मंदिरातून भरदिवसा भगवान पार्श्वनाथ आणि नवग्रह अशा पंचधातूच्या दोन मूर्ती चोरीला गेल्याचे बुधवारी निदर्शनास आले़ प्रारंभी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने दिरंगाई झाली़ शेवटी मंदिराचे पुजारी महावीर वनकुद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चडचण पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Theft of idols from ancient Jain temple