अक्कलकोटमध्ये डॉक्टरांच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST2021-04-03T04:19:39+5:302021-04-03T04:19:39+5:30
नवीन राजवाडाजवळ प्रमिला पार्क येथे अनेक दिवसांपासून बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पाटील राहतात. नेहमीप्रमाणे घटना घडलेल्या दिवशी पहाटे ६.३० वाजता ...

अक्कलकोटमध्ये डॉक्टरांच्या घरी चोरी
नवीन राजवाडाजवळ प्रमिला पार्क येथे अनेक दिवसांपासून बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पाटील राहतात. नेहमीप्रमाणे घटना घडलेल्या दिवशी पहाटे ६.३० वाजता ते वॉकिंगला गेले होते. ८ वाजता परत आले होते. सकाळी ९ वाजता हॉस्पिटलमध्ये काम करणारा मैनोदीन तांबोळी यांनी मोबाईल करून सांगितले की, हॉस्पिटलमध्ये आवारात लेडिज पर्स व पॉकेट पडल्याचे सांगितले. त्यावरून येऊन पाहिले असता, आमचीच असल्याची खात्री डॉक्टर पाटील यांना झाली. त्यानंतर पाहिले असता, घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम १० हजार रुपये असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत डॉ. पाटील यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत.