कापड दुकानातून ७० हजाराच्या मुद्देमालाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST2021-03-22T04:21:02+5:302021-03-22T04:21:02+5:30

महिम (ता. सांगोला) येथील बाबासाहेब परमेश्वर जाधव यांचे महुद-दिघंची रस्त्यावर श्री क्लॉथ स्टोअर्स नावाने कापड दुकान आहे. शनिवारी रात्री ...

Theft of 70,000 items from a cloth shop | कापड दुकानातून ७० हजाराच्या मुद्देमालाची चोरी

कापड दुकानातून ७० हजाराच्या मुद्देमालाची चोरी

महिम (ता. सांगोला) येथील बाबासाहेब परमेश्वर जाधव यांचे महुद-दिघंची रस्त्यावर श्री क्लॉथ स्टोअर्स नावाने कापड दुकान आहे. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास कापड दुकान बंद करुन ते घराकडे परतले. दरम्यान रविवारी सकाळी ९.२० च्या सुमारास कापड दुकान उघडले असता दुकानातील कामगार विशाल येडगे यास दुकानातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले तर दुकानावरील पत्र्यांचे हूक खाली पडल्याचे दिसून आले. त्याने वरती पाहिले असता पत्रा उचकटलेला दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक अनोळखी इसम दुकानात इकडे तिकडे फिरताना दिसून आला. त्या चोरट्याने दुकानातील शालू, साड्या, शर्टिंग तागे, लहान मुलांचे कपडे असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत बाबासाहेब परमेश्वर जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Theft of 70,000 items from a cloth shop