हन्नूर येथे ३ लाख ११ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST2021-05-14T04:22:16+5:302021-05-14T04:22:16+5:30

हन्नूर येथील शेतकरी मैनोद्दीन मौला जमादार यांचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले २ लाख रुपये रोख रक्कम, ५५ ...

Theft of 3 lakh 11 thousand at Hannoor | हन्नूर येथे ३ लाख ११ हजारांची चोरी

हन्नूर येथे ३ लाख ११ हजारांची चोरी

हन्नूर येथील शेतकरी मैनोद्दीन मौला जमादार यांचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले २ लाख रुपये रोख रक्कम, ५५ हजार रुपये किमतीचे अर्ध्या तोळ्याचे दोन अंगठ्या, १ तोळ्याचे एक अंगठी, ५५ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे बोरमाळ, कानातील फुले, १ हजार रुपये रोख असे एकंदरीत ३ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरीस नेल्याची फिर्याद मडोळप्पा विठ्ठल भरमशेट्टी यांनी दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, बिट अंमलदार बिराजदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

----

चौकट:

पोलिसांना आव्हान

बुधवारी याच भागात चप्पळगाव येथे आठ घरात चोरी चोरट्याने केली आहे. ४ लाखापेक्षा अधिक मुद्देमाल लंपास केला आहे. दुसऱ्या दिवशी तेथून सहा किलोमीटर अंतरावर हन्नूर येथे ३ लाखाची चोरी होते. हे एक प्रकारचे चोरट्याने पोलिसांना दिलेले आव्हानच म्हणावे लागेल.

---

Web Title: Theft of 3 lakh 11 thousand at Hannoor