'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु
By शीतलकुमार कांबळे | Updated: August 19, 2023 13:27 IST2023-08-19T13:26:48+5:302023-08-19T13:27:26+5:30
बांधकामाची सीईओंकडून पाहणी.

'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु
सोलापूर : केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. फक्त घरचं न देता रस्ता पाणी व त्यांच्या शिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा परिषदेकडून रे नगरमध्ये ४० अंगणवाड्या सुरु होणार आहे. या अंगणवाड्यांच्या बांधकामाची पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केली. त्यामुळे रे नगरमध्ये अंगणवाडीतील आईच पत्र हरवलं हा आवाज ऐकायला मिळेल.
रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पात रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
सध्या २१ अंगणवाड्यांच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर १९ अंगणवाडीच्या बांधण्याचे काम सुरु झाले असून त्याचा पाया तयार करण्यात आला आहे. सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन लोक रहायला आल्यानंतर या अंगणवाडीमध्ये सेविकांच्या नेमणूका होणार आहेत.
- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग