शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:18 IST

Asra railway bridge : आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती.  त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती.

सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आसरा उड्डाणपुलासाठी गडकरी यांनी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  या निधीतून होणाऱ्या कामामुळे आसरा पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. 

आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती.  त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. आमदार देशमुख यांनी स्वतः आसरा पुलावर जाऊन याची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठकही घेत आराखडा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिका या पूलासाठी २६ कोटी रुपयांचा  विकास आराखडा तयार केला होता. 

एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्याकडे आसरा पुलासाठी निधीची मागणी केली होती. यावेळी गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार गडकरींची भेट घेऊन याचा पाठपुरावा केला. अखेर  त्यांच्या पाठपुरावाला यश आले असून नितीन गडकरी यांनी या पुलासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गडकरी  जे बोलतात ते करतात: आ.  देशमुख नितीन गडकरी हे जे बोलतात ते करतातच याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आह.  ते सोलापूर दौऱ्यावर आले असता आपण त्यांना केवळ दोनच मिनिटात आसरा पुलाची परिस्थिती सांगितली होत.  त्यांनी तात्काळ या पुलासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते,  ते त्यांनी पाळले आहे आणि निधी मंजूर केला आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हणत गडकरी यांचे आभार मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSolapurसोलापूर