शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नो पार्किंगमधील उचललेल्या गाडीची माहिती पाहून पोलिस ही झाले थक्क

By रूपेश हेळवे | Updated: June 8, 2023 17:12 IST

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सिद्रामप्पा वीरभद्रप्पा स्वामी ( नेमणूक शहर वाहतूक शाखा, दक्षिण विभाग ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोलापूर : नो पार्किंग मधून वाहतूक शाखेने एक दुचाकी उचलली. यानंतर दंड भरण्यासाठी मुळ मालकाला बोलवण्यानंतर ज्या गाडीवर कारवाई करण्यात आली होती, त्या गाडीचे नंबरच बनावट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय ती गाडी आरटीओकडे रजिस्ट्रेशन न करताच दोघांनी वापरली. त्यानंतर मनानेच त्यावर नंबर टाकल्याची माहिती तपासात उघड झाली. 

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सिद्रामप्पा वीरभद्रप्पा स्वामी ( नेमणूक शहर वाहतूक शाखा, दक्षिण विभाग ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सैपन सदाकत कुरेशी (वय २२, रा. बेगम पेठ) व आशितोष रामकृष्ण दंडी (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी दंडी याने २०१८ मध्ये दुचाकी घेतली होती. त्या दुचाकीची नोंदणी त्याने आरटीओ कार्यालयाकडे केलेली नव्हती. त्यानंतर २ वर्षाने त्या दुचाकीचा आरोपी सैपन कुरेशी याच्यासोबत व्यवहार झाला. त्यानंतर आरोपी कुरेशी याने बनावट नंबर प्लेट लावून ती दुचाकी वापरत होता. काही दिवसापूर्वी ती दुचाकी एका नो पार्किंग मधून वाहतूक शाखेने उचलली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर