शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शोभेची दारु बनवताना झालेल्या स्फोटातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 23, 2023 14:03 IST

माढा तालुक्यातील कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला होता

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: माढा तालुक्यात मोडनिंबजवळ जाधववाडी येथे शोभेची दारु बनवत असताना कारखान्यात अचानक स्फोट होऊन शनिवारी दुपारी ३८ वर्षीय दत्तात्रय बिनगे (रा. मोडनिंब, ता. माढा) हा तरुण भाजून गंभीर जखमी झाला होता. मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार शनिवारी दुपारी १२ वाजता मोडनिंब जवळील जाधववाडी शिवारात मधुकर बिनगे यांच्या व द्राक्ष बागे लगत एका दहा बाय बारा आकाराच्या पत्रा शेडमध्ये स्फोटक पदार्थापासून शोभेची दारू बनविण्याचे काम सुरू होते. दरम्यान मोठा स्फोट झाला आणि या घटनेत दत्तात्रय हा भाजून जखमी झाला.

या स्फोटानंतर या शेडवरील पत्रे उडाले आणि जाळ व धुराचे लोळ उठले. त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. या स्फोटाच्या आवाजाने जवळचे शेतकरीही धावून आले आणि माहिती मिळताच पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालय उपचारासाठी तत्काळ हलवण्यात आले. मात्र तो मृत्यूशी झूंज देत राहिला. रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातून त्याचा मृतदेह जाधववाडीतील शेतात आणण्यात आला. रविवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, पाच मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

आचारी व्यवसायातून शोभेच्या दारुकामाकडे

या घटनेपूर्वी अर्थात दहा वर्षांपूर्वी दत्तात्रय हा लग्न समारंभात आचारी म्हणून काम करीत होता. मात्र अर्थार्जन भागत नसल्याने आठ वर्षांपूर्वी तो शेटफळ येथील शिवप्पा निंबाळकर यांच्याकडे शोभेच्या दारुकामासाठी आला. त्यांनी बनविलेली शोभेची दारु, तोफा दत्तात्रय हा गावच्या यात्रांमध्ये आणि राजकीय सभा, विविध सोहळ्यांप्रसंगी उडवायचा. यातून काही दिवसांपूर्वी त्याने शोभेची दारु बनविण्याचा कारखाना जाधववाडीत सुरू केला होता असे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू