शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी स्फोट... फटाका कारखान्याच्या मालकास ज्वारीच्या पिकातून अटक, आज पांगरी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:52 IST

आरोपींच्या अटकेसाठी पांगरीत कडकडीत बंद

विठ्ठल खेळगी

सोलापूर/ कुसळंब : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बेकायदेशीरपणे चालणा-या फटाके कारखान्यातील स्फोट व चार महिला कामगारांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारखाना मालक व भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेल्या दोघांपैकी कारखाना मालकास मंगळवारी सकाळी शिराळे शिवारातील ज्वारीच्या पिकातून पांगरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी मंगळवारी पांगरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये मुख्य बाजारपेठसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

युसुफ हाजी मणियार (रा.पांगरी ता.बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या कारखाना मालकाचे नाव असून भागीदार नाना पाटेकर (रा.उस्मानाबाद) हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कामगीरी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस  अधिकारी  जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस पथकाचे प्रमुख सपोनी नागनाथ खुने, सहाय्यक फौजदार सतिश कोठावळे, सुनील बोदमवाद, अर्जुन कापसे, संतोष कोळी यांच्या पथकाने केली.रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पांगरी-शिराळे रस्त्यावरील  इंडीयन फायर वर्क्स या फटाके निर्मितीच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन चार महिला कामगारांचा मृत्यु झाला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी  सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास पांगरी येथील त्या दुर्घटनाग्रस्त फटाके कारखान्यास भेट दिली होती. तसेच तीन पथके तयार केली होती.मुंबई, पुणे, विजयपूरच्या दिशेने पथके

एक पथक पुणे, मुंबई, ठाणे आदी भागात रवाना केले होते. तर दुसरे पथक हुबळी, सोलापूर, विजयपूर आदी भागात पाठवले होते. तर पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनी नागनाथ खुने यांचे पथक उस्मानाबाद, केज, बिड, धारूर, कळंब आदी भागात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी मणियार हा शिराळे हद्दीतील सुतार शेतातील ज्वारी पिकांमधून अटक केली.

टॅग्स :barshi-acबार्शीSolapurसोलापूरBlastस्फोट