शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:35 IST

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे

सोलापूर/मंगळवेढा : आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात आई कुठेच कमी पडत नाही. आई मोलमजुरी करुन, स्वत: कष्टाने भाकर मिळवून आपल्या लेकरांना मोठं करते, समाजात ताठ मानेनं फिरता यावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असते. मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे गावातील शांताबाई थोरबोले यांचीही गोष्ट अशीच आहे. काबाडकष्ट करुन, मोल मजुरी करुन या माऊलीने आपल्या दोन्ही मुलांना मोठं केलं, उच्च शिक्षण दिलं. आज, त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले. शांताबाई यांचा थोरला मुलगा महावितरणच्या परीक्षेत राज्यात पहिला आला. 

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज झाले आहे. मुलाच्या यशाच्या आनंदाने आई शांताबाई थोरबोले यांना आकाश ठेंगणे झाले. अपार कष्टाचे सोडले नाही. मुलाने चीज केल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

रवी याने बारावीचे शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा तर भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे इंजिनीअरींग शिक्षण झाले. आई- वडिलांचे कष्ट शिकून दूर करण्याचा निश्चय केला. २०१५ पासून आयआयटी तयारी, २०१७ पासूनशांताबाई थोरबोले रविराज थोरबोले यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. कोरोनामुळे गावाकडे नऊ महिने अभ्यास त्यानंतर २०२१ दिल्लीला गेला तिथे अभ्यास केला. आजपर्यंत विविध २० परीक्षा दिल्या यश आले नाही, म्हणून कधीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. 

दरम्यान, आता १९ फेब्रुवारी रोजी यूपीएससीची परीक्षा असून यश मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी केली आहे. आई गावात मोलमजुरी करते, दोन्ही मुले हुशार मोठ्या कष्टाने मुलांना शिक्षण दिले. एका मुलाला अधिकारी बनविले तर दुसराही मुलगा लिंगराज एमपीएससीची तयारी करत आहे.. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाSolapurसोलापूरmahavitaranमहावितरण