सोलापूर : माझ्या घरी सोडा म्हणून मुलीनं केला गळफास घेण्याचा प्रयत्न, रिमांड होममध्ये घडला प्रकार
By विलास जळकोटकर | Updated: April 10, 2023 18:02 IST2023-04-10T18:02:25+5:302023-04-10T18:02:36+5:30
तत्काळ आजूबाजूच्यांनी तिला खाली उतरविले. जास्मीन (वय- १६, रा. रिमांड होम) असे या मुलीचे नाव आहे.

सोलापूर : माझ्या घरी सोडा म्हणून मुलीनं केला गळफास घेण्याचा प्रयत्न, रिमांड होममध्ये घडला प्रकार
सोलापूर - ‘मला माझ्या घरी जायचे आहे, माझ्या घरी सोडा’ म्हणून रागाच्या भरामध्ये रिमांड होममध्ये राहणाऱ्या मुलीनं एका खोलीत लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तत्काळ आजूबाजूच्यांनी तिला खाली उतरविले. जास्मीन (वय- १६, रा. रिमांड होम) असे या मुलीचे नाव आहे.
यातील गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीला रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे. ती सारखी येथील काळजीवाहक, कर्मचाऱ्यांना ‘मला घरी जायचे आहे, सोडा’ अशी विनंती करीत होती. कोणीही आपणास बाहेर सोडत नाही म्हणून तिने रविवारी दुपारच्या वेळी तिच्या खोलीत जाऊन लोखंडी अँगलला ओढणी अडवून गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ हा प्रकार समजल्याने कर्मचारी धावले तिला खाली उतरवले. उपचारासाठी काळजीवाहक पदमावती ढवारे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.