शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उडगीत कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविला, जय हो कर्नाटकचा नारा; महाराष्ट्रात सुविधा नसल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:02 IST

ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावोपाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे. उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम  येथील लोकप्रतिनिधी केले आहे.महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे.शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर शेतकऱ्यांना सोईसुविधा मिळतात.

सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाहीत, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामधून जनतेतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उडगी हे महाराष्ट्रात असून येथील उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर, पुणे,मुबंईला जावे लागते.त्यामुळे भाषेची अडचण येते.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांना रोजगार यापासून वंचित राहावे लागत आहे. या उलट कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, उसाला वाढीव दर, शेतीसाठी पाणी, हमी भाव,खते, बियाणे,शेतीसाठी अवजारे, डिझेल-पेट्रोल इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिली जाते, असे वेळी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सुरेश माडयाळ, महादेव येळमेली, श्रीकांत कोळी, सोमु आलूरे, रमेश भांड, धुळप्पा जिगजंबगी, विशाल प्याटी, कल्लप्पा कामा,शालेश मकानदार, सुरेश हदपद, उमेश, कोळी, शरणू, कोळी, शरणप्पा कुंभार, देवेंद्र नारायणकर, नागप्पा म्हेत्रे इत्यादी उपस्थित होते. "महाराष्ट्र राज्य सरकारने १५ व्या वित्तआयोगातून ग्रामपंचायत मिळणारा ५० ते ६० निधी कपात  केल्याने परिणामी गावाचा विकास कसा होणार.जल जीवन मिशन मार्च मध्ये मंजूर मिळाली आहे.अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही. आरोग्य उपकेंद्रा मध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सुद्धा अजून तरी औषधे उपलब्ध झाली नाहीत. अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचा वांरोवार पाठपुरावा करावा लागतो. वेळेत राज्य शासनाकडून भौतिक सुविधा पूर्ण क्षमतेने मिळत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत.मात्र ते सुटत नाहीत.त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहोत."

-लक्ष्मीबाई म्हेत्रे, सरपंच, उडगी 

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटKarnatakकर्नाटक