भरधाव वेगातील ट्रकनं धडक देताच कार गेली ६० फुट घसरत; सोलापूरजवळील घटना
By Appasaheb.patil | Updated: April 24, 2023 16:53 IST2023-04-24T16:52:58+5:302023-04-24T16:53:11+5:30
भरधाव वेगातील ट्रकने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार ५० ते ६० फुट घसरत गेली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले.

भरधाव वेगातील ट्रकनं धडक देताच कार गेली ६० फुट घसरत; सोलापूरजवळील घटना
सोलापूर : भरधाव वेगातील ट्रकने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार ५० ते ६० फुट घसरत गेली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. शिवाय दोघे जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळील उड्डाणपुलावर घडली.
स्नेहल सुमित हिरवे (वय ३५, रा. रास्ता पेठ, प्लॅट नंबर १, अंबिका मोटार्स बिल्डींग पवार हाऊसजवळ, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर शिवाजी यादव (वय ३०, रा. बचेरी, ता. माळशिरस) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर ते पुणे हायवे रोडवर कोंडी येथील उड्डाणपुलावर एमएच १२ एसवाय ३९४८ ही घेऊन जात असताना पाठीमागून येणारी ट्रक एमएच ०९ ईएम ५२०४ च्या चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवून पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार ५० ते ६० फुट घसरत गेली. यात कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत.