सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला सादर होणार
By Appasaheb.patil | Updated: February 14, 2023 13:47 IST2023-02-14T13:47:08+5:302023-02-14T13:47:17+5:30
सोलापूर महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक येत्या २० फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे,

सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला सादर होणार
सोलापूर :
सोलापूर महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक येत्या २० फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली. दरम्यान, यंदाच्या अंदाजपत्रकात शासनाच्या योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या तयारीची लगबग गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सर्व विभागाकडून यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी आढावा घेतला आहे. यंदाच्या प्रशासकीय राजवटीतील हे पहिलेच अंदाजपत्रक राहणार आहे. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली- उगले या हे अंदाजपत्रक २० फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. वास्तववादी अंदाजपत्रक राहणार असल्याचे संकेत यापूर्वीच आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिले आहेत. कोणतीही वाढ करण्यापेक्षा थकबाकी वसुलीला प्राधान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यंदाच्या या पहिल्याच प्रशासकीय अंदाजपत्रकामुळे शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले आहे.
शासनाकडून मंजूर झालेल्या प्रकल्पांना महापालिका हिश्यांचे पैसे प्राधान्याने देऊन माेठमोठे प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे, त्यादृष्टीने महापालिकेने अंदाजपत्रकात मोठी तरतूद केली आहे. शहरात नव्याने होत असलेल्या दोन उड्डाणपुल, अमृत योजना, रस्ते, ड्रेनेज लाइन, पाणीपुरवठा आदी विभागांसाठीही निधीची मोठी तरतूद अंदाजपत्रकात असल्याचेही सांगण्यात आले.