टेंभुर्णीत विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:20 IST2021-05-22T04:20:52+5:302021-05-22T04:20:52+5:30

२१ मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी लागू केलेल्या दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलीस अधीक्षक ...

Testing of unruly wanderers in Tembhurni | टेंभुर्णीत विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी

टेंभुर्णीत विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी

२१ मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी लागू केलेल्या दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशाने टेंभुर्णी पोलिसांनी शहरातील करमाळा चौकात मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी पोनि. राजकुमार केंद्रे यांनी मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली व दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ही रॅपिड अँटिजन टेस्ट आरोग्य सेवक कलासागर घंटे, संजय बैरागी यांनी केली. या कारवाईत एएसआय अभिमान गुटाळ, पोहेकॉ. बोराटे, पोकॉ. राजेंद्र खंडागळे, पोना. सीताराम गायकवाड, पोकॉ. सचिन साळुंके, पोकॉ. प्रसाद काटे, होमगार्ड अक्षय परांडे, होमगार्ड कांबळे आदींनी भाग घेतला.

--

फोटो : २१ टेंभुर्णी

ओळी : टेंभुर्णी येथे मोकाट फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजन टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी व पोलीस.

Web Title: Testing of unruly wanderers in Tembhurni