आढीवमध्ये तलवार फिरवत माजवली दहशत<bha>;</bha> तरुण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST2021-01-09T04:18:30+5:302021-01-09T04:18:30+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आढीव येथील सागर पासले हा हातात तलवार घेऊन फिरत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर ...

Terror in possession of a young man wielding a sword in Adhiva | आढीवमध्ये तलवार फिरवत माजवली दहशत<bha>;</bha> तरुण ताब्यात

आढीवमध्ये तलवार फिरवत माजवली दहशत<bha>;</bha> तरुण ताब्यात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आढीव येथील सागर पासले हा हातात तलवार घेऊन फिरत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांनी सहा. फौजदार अशोक जाधव, पोलीस नाईक प्रकाश कोष्टी, नितीन माळी, श्रीराम ताटे यांच्या पथकास खासगी वाहनाने आढीव गावात पाठविले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या समोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेऊन उभा असलेला दिसला. त्यास गराडा घालून जागीच पकडले. सागर पासले याच्याजवळ शस्त्र बाळगण्याचा परवाना नाही. तरीही तो लोखंडी तलवार बेकायदेशीर जवळ बाळगलेल्या परिस्थितीत आढळून आला. यामुळे त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, प्रमाणे गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अशोक जाधव करत आहेत.

Web Title: Terror in possession of a young man wielding a sword in Adhiva