बार्शी: सोलापूरकडे कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो अन् कारची समोरासमोर टक्कर होऊन कार चालवत असलेले बार्शीचे युवा उद्योजक सागर जयेश कोठारी गंभीर जखमी होऊन ठार झाले. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
बार्शी तालुक्यातील कुसळंब येथून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आयशर टेम्पो (एमएच ४८ एआर ५८५८) सोलापूरला जात होता. राळेरास येथील वनविभागाजवळ टेम्पो येताच बार्शी येथील कोठारी गॅस एजन्सीचे मालक सागर कोठारी हे सोलापूरहून बार्शीकडे (एमएच १३ के ९९०९) स्वतः कार चालवत बार्शीकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यात कोठरीच्या कारची समोरची बाजू पूर्णपणे चमटून रोडच्या बाजूला गेली. त्यात कोठारीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याच रस्त्यावर अवघ्या तीनशे मीटर अंतरावर केवळ अर्ध्या तासापूर्वी एका उसाच्या ट्रॅक्टरचा आणि कारचा अपघात झाला होता. या अपघाताचा गुन्हा वैराग पोलिसांत रात्री उशिरापर्यंत चालू होता.