भाडेकरू महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:35+5:302021-07-03T04:15:35+5:30

टेंभुर्णी : भाडेकरू महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी घर मालकाविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल ते जून या ...

Tenant woman abused | भाडेकरू महिलेवर अत्याचार

भाडेकरू महिलेवर अत्याचार

टेंभुर्णी : भाडेकरू महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी घर मालकाविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत या काळात त्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित महिला नोव्हेंबर २०२० पासून पप्पू नावाच्या घर मालकाकडे पती आणि दोन मुलांसह भाड्याने राहत होती. अत्याचार काळात पीडित महिलेचा पती रात्री घरी नसल्याची संधी साधून त्याने अत्याचार केला. त्यानंतर पती कामावर गेल्यानंतर संधी साधून तो अत्याचार करायचा. २९ जून रोजी आईला घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात ती आली व तिने घर मालकाविरोधात फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.

Web Title: Tenant woman abused