पतीच्या निधनानंतर दहा तासाने पत्नीनेही घेतला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:22 IST2021-05-08T04:22:23+5:302021-05-08T04:22:23+5:30

बार्शी : एका सेवानिवृत्त प्राचार्यांच्या निधनानंतर दहा तासांनी त्यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना बार्शी शहरात उपळाई रोडवर घडली. ...

Ten hours after her husband's death, his wife also said goodbye | पतीच्या निधनानंतर दहा तासाने पत्नीनेही घेतला निरोप

पतीच्या निधनानंतर दहा तासाने पत्नीनेही घेतला निरोप

बार्शी : एका सेवानिवृत्त प्राचार्यांच्या निधनानंतर दहा तासांनी त्यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना बार्शी शहरात उपळाई रोडवर घडली. या घटनेबद्दल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दत्तात्रय नामदेव अंधारे (वय ८४) आणि दमयंती अंधारे (वय ८०) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. दिनांक ५ मे रोजी सायंकाळी दत्तात्रय तर ६ मे रोजी पहाटे त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

दमयंती अंधारे या शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळातून हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या तर त्यांनी याच संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय, बार्शी, महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव आणि आगळगावातील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षिका म्हणूनही काम केले.

अंधारे कुटुंब हे परांडा तालुक्यातील माणकेश्वर येथील असून, बार्शी तालुक्यात नोकरीसाठी आले अन‌् उपळाई रोडवर स्थायिक झाले.

दहा तासांच्या अंतराने पती-पत्नीचे निधन झाल्याने अंधारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

----

०६ दत्तात्रय अंधारे

०६ दमयंती अंधारे

Web Title: Ten hours after her husband's death, his wife also said goodbye